Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तुळशी विवाह : जाणून घ्या महत्व, शुभ मुहूर्त व पूजा कशी करावी


कार्तिकी एकादशीनंतर दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह साजरा करतात. यंदा ४ नोव्हेंबर रोजी एकादशीनंतर आज दि. ५ नोव्हेंबरपासून तुळशी विवाहाला प्रारंभ होत असून दि. ५ ते ८ नोव्हेंबरपर्यंत तुळशी विवाहाचे मुहूर्त आहेत.5 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 06.08 वाजता द्वादशी तिथी सुरू होईल. द्वादशी तिथी 6 नोव्हेंबर (रविवार) संध्याकाळी 05:06 मिनिटांपर्यंत राहील. तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त 6 नोव्हेंबरला दुपारी 01:09 ते 03:18 पर्यंत राहील.

 तुळशी विवाहाचे महत्त्व 👇

धार्मिक मान्यतांनुसार भगवान विष्णू चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर कार्तिकी एकादशीला निद्रावस्थेमधून पुन्हा जागे होतात आणि शुभ कार्यांना, लग्न समारंभांना सुरुवात केली जाते. कार्तिकी द्वादशी ते पौर्णिमेच्या दिवसापर्यंत तिन्ही सांजेच्या मुहूर्तावर तुळशीचे लग्न लावले जाते. तुळशीचे लग्न लावणाऱ्याला कन्यादानाचे पुण्य लाभते तसेच घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळतो, अशी धारणा आहे.असे मानले जाते की जे लोक कन्या सुखापासून वंचित राहतात त्यांनी या दिवशी तुळशीचा विवाह भगवान शालीग्रामसोबत केल्यास त्यांना कन्यादानाचे फळ प्राप्त होते. या दिवसापासून लोक सर्व शुभ कार्यांना सुरुवात करू शकतात. तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो असे मानले जाते. या वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण ८ नोव्हेंबरला आहे. कार्तिक पौर्णिमेला हे चंद्रग्रहण आहे. हे या वर्षातील शेवटचे ग्रहण आणि दुसरे खग्रास चंद्रग्रहण राहणार आहे.

 अशी करतात पूजा 👇

तुळशी विवाहासाठी पाटावर आसन टाकून तुळस आणि शाळीग्राम मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. पाटाभोवती ऊसाने मंडप सजवून कलश ठेवला जातो. सर्वप्रथम कलश आणि गौरी गणेशाची पूजा करावी. त्यानंतर माता तुळशीला आणि भगवान शालिग्रामला धूप, दिवा, वस्त्र, माळा, फुले अर्पण करा. तुळशीला श्रृंगार आणि लाल ओढणी अर्पण केली जाते. तुलसी मंगलाष्टक पठण झाल्यावर भगवान विष्णू आणि तुळशीची आरती केली जाते.

हिंदू धर्मात विवाह इत्यादी शुभ कार्ये कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीपासून सुरू होतात. या दिवशी तुळशीशी शालिग्रामचा विवाह करण्याची परंपरा आहे. जो भक्त तुळशीविवाहाचा विधी करतो, त्याला कन्यादानाचे पुण्य मिळते, असे मानले जाते. दुसरीकडे, एकादशीच्या व्रताबद्दल अशी श्रद्धा आहे की, वर्षातील सर्व 24 एकादशींचे व्रत केल्याने लोकांना मोक्ष मिळते.

तुळशी विवाहासाठी अंगणाच्या मध्यभागी तुळशीचे रोप लावले जाते. तुळशीच्या समोर चंदन, सिंदूर, सुहाग वस्तू, तांदूळ मेहंदी, मोली धागा, फुले, आणि मिठाई पूजेच्या साहित्य ठेवली जाते. तुळशीच्या शेजारी रांगोळी काढली जाते. या तुळशीविवाहासाठी काही वस्तू असणे आवश्यक असते.

एकादशीला पूजास्थळी मंडप उसाने सजवला जातो. भगवान विष्णूची मूर्ती खाली विराजमान करून भगवान विष्णूला मंत्रांनी जागृत करण्यासाठी पूजा केली जाते.

तुळशीला नवरीसारखे सजवा 

प्रत्येकजण आवडी प्रमाणे आणि हौस म्हणून तुळशीला सजवण्याचा प्रयत्न करत असतो. काही जण तुळशीच्या रोपट्याला साडी देखील नेसवतात.

गौरीप्रमाणे पूजा

तुळशीची गौरीप्रमाणे पूजा करतात. तिला साडी, चोळी, नथ, सोन्याचे दागिने घालतात. सोन्याचे मंगळसूत्र, चांदीची जोडवी, खणा-नाराळाने ओटी भरतात. तुळशीला नैवद्याचे गोड पदार्थ घराण्याच्या परंपरेनुसार केले जातात.

तुलसी विवाह कथा👇

पौराणिक कथेनुसार, एकदा माता तुळशीने भगवान विष्णूंना क्रोधाने शाप दिला की, तू काळा दगड होशील. या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी देवाने शालिग्राम पाषाणाच्या रूपात अवतार घेतला आणि तुळशीशी विवाह केला. दुसरीकडे, तुळशीला देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते. अनेकजण एकादशीला तुळशीविवाह करत असले तरी कुठेतरी तुळशीविवाह द्वादशीच्या दिवशी होतो. अशा परिस्थितीत तुळशी विवाहासाठी एकादशी आणि द्वादशी या दोन्ही तिथींची वेळ निश्चित करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.