गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयातून शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा प्रचार शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिक्षक व पदवीधर मतदारसंघातून उभे असलेले उमेदवार डॉ.अनिल कुराडे, प्रा.रघुनाथ ढमकले, डॉ. सचिन पवार, डॉ. सागर व्हनाळकर यांनी आपली भूमिका विस्ताराने मांडली.
प्रा. ढमकले म्हणाले, शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीने गेली पंधरा वर्षे विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शिक्षक, विद्यार्थी व विद्यापीठाकरिता काम केले आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटमध्ये विकास आघाडीची सत्ता असायला हवी. यावेळी गडहिंग्लज, आजरा, चंदगड व भुदरगड तालुक्यातील बहुसंख्य प्राध्यापक उपस्थित होते. सर्वानी शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला.


