Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीचा "गोड प्रारंभ"


गडहिंग्लज (प्रतिनिधी ):
आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना निवडणुकीत छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे संस्था गटातील उमेदवार सोमनाथ विनायक पाटील हे विजय झाले. त्यांना एकूण 199 मते पडली. विरोधी श्री काळभैरव शेतकरी कामगार विकास आघाडीचे उमेदवार शिवाजी खोत यांना 37 मते पडली. यामध्ये एक मत बाद ठरले. मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर संस्था गटातून सोमनाथ पाटील विजय झाल्याने माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शाहू समविचारी आघाडीचा "गोड प्रारंभ" झाला आहे. सध्या मतमोजणी सुरू आहे.

रविवारी मतदानानंतर छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या सर्वच नेत्यांनी संस्था गटातून सोमनाथ पाटील यांचा विजय निश्चित असून केवळ अधिकृत घोषणाची आम्ही वाट पाहत आहोत असे म्हटले होते. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर संस्था गटाचा पहिला निकाल जाहीर झाला. यामध्ये  सोमनाथ पाटील विजय झाल्याने  नेतेमंडळींनी वर्तवलेले भाकीत खरे ठरले. सध्या मतमोजणी प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.