गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज- उत्तूर मार्गावर जखेवाडी फाटा येथे आयशर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोघेजण जखमी झाले आहेत. पांडुरंग केशव पाटील ( वय 47, इचलकरंजी), शिवाजी यशवंत पाटील ( राहणार कडगाव, तालुका गडहिंग्लज) अशी जखमींची नावे आहेत. या अपघाताची नोंद गडहिंग्लज पोलिसात झाली आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की, आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पांडुरंग पाटील व त्यांचे नातेवाईक शिवाजी पाटील हे दोघे होंडा अॅक्टिवा( एमएच 09, बीजी0805 ) गाडीने इचलकरंजीहून गडहिंग्लज मार्गे कडगाव गावातून चिंचेश्वर मंदिर पासून पुढे गडहिंग्लज-उत्तुर मार्गावर जखेवाडी फाट्यानजीक आले असता उत्तुरकडे जाणाऱ्या आयशर ट्रकने ( एम एच07, एजे5622) त्यांना समोरून धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघेही जखमी झाले आहेत. यामध्ये दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
