Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

"वाणिज्य" सर्वात जास्त रोजगार मिळवून देणारी ज्ञानशाखा: प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
वाणिज्य शाखा ही सर्वात जास्त रोजगार मिळवून देणारी ज्ञानशाखा आहे. या शाखेतून पदवी घेतल्यानंतर रोजगाराच्या खूप संधी उपलब्ध आहेत. म्हणून विद्यार्थ्यांनी वाणिज्य विषयाचे परिपूर्ण ज्ञान घेणे आवश्यक आहे. शिवाय वेगवेगळे कौशल्यही आत्मसात करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन कर्मवीर हिरे महाविद्यालय गारगोटीचे प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील यांनी केले.

येथील शिवराज महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित बी.कॉम भाग एक आयटी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस.एम.कदम होते.

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक डॉ.महेश चौगुले यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. दीपक खेडकर यांनी करून दिला. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.पाटील पुढे म्हणाले, बी.कॉमची तीन वर्षे महत्वाची आहेत.या शाखेत विद्यार्थ्यांनी गांभीर्याने अभ्यास करणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करून नवनवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.दिग्विजय कुराडे यांची 'गोडसाखर' च्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी सचिव डॉ.अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, डॉ. बी.एम.जाधव, प्रा. नाझिया बोजगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रार्थना देसाई यांनी केले. आभार प्रा. बियामा वाटंगी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.