Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महिलांनी समाजात आपले स्थान बळकट करावे : न्यायाधीश एस. ए. राठोड


गडहिंग्लज (प्रतिनिधी): 
महिलांनी कायद्याचे ज्ञान घेऊन समाजातील महिलांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच महिलांनी समाजात वावरताना आपला स्वतःचा व कुटुंबाचा विकास साधून समाजात आपले स्थान बळकट करावे. महिलांवर अत्याचार होऊ नयेत यासाठी समाजात जागृती निर्माण होणे गरजेचे आहे. असे मत गडहिंग्लज येथील सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस.ए. राठोड यांनी व्यक्त  केले.

महागाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय हिंसाचार निर्मूलन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

प्राचार्य डॉ. एस. एच.सावंत यांनी स्वागत केले. यावेळी महिला विकास कक्षाचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गजानन महाराजांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी सेवानिवृत्त ॲड. सौ.आशा घाटगे, सौ.शितल साळवी, महिला विकास कक्ष समन्वयक प्रा. ए.पी.नारायणकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. एस. बी. पवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एन. आर. देसाई यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.