Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राज ठाकरे यांना कोल्हापूर जिल्हा मनसेकडून छत्रपती शिवरायांची कलाकृती भेट

मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी कलाकृती भेट देत केले स्वागत 

कोल्हापूर: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना छत्रपती शिवरायांची कलाकृती भेट देत स्वागत करताना मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले. यावेळी उपस्थित इतर पदाधिकारी.

कोल्हापूर (प्रतिनिधी):
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्याप्रसंगी त्यांना जिल्हा मनसेच्या वतीने छत्रपती शिवरायांची कलाकृती भेट देऊन स्वागत करण्यात आले. राज ठाकरे दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे स्वागत कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, जयराजदादा लांडगे, पुंडलिक जाधव यांनी छत्रपती शिवरायांची कलाकृती भेट देत केले. 

यावेळी शहर अध्यक्ष राजू दिंडोरले, जिल्हाध्यक्ष गजानन जाधव, परिवहन सेना जिल्हाध्यक्ष विजय कराजगार, सचिव प्रसाद पाटील, मराठी कामगार सेना जिल्हा सचिव सुधाकर पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, ठाकरे यांनी काल कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच छत्रपती शिवाजी चौकात शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच ज्येष्ठ इतिहास तज्ञ डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निवासस्थानीही श्री.ठाकरे यांनी सदिच्छा भेट देत चर्चा केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.