Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भाऊसाहेब आंबुलकर यांचे स्पर्धा परीक्षेत यश


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
सीमा भागातील धोंडगट्टे या गावातील रहिवाशी व शेतकरी कुटुंबातील असलेल्या भाऊसाहेब रावसाहेब आंबुलकर या विद्यार्थ्याने नुकत्याच घेतलेल्या एम.पी.एस. सी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उज्वल यश संपादन केले. स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून त्याची निवड झाली आहे

या स्पर्धा परीक्षेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये आंबुलकर याने संपादित केलेले सुयश खरोखरच अभिनंदन आहे, असे उद्गार शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी काढले. प्राचार्य डॉ. एस.एम.कदम, संस्थेचे सचिव डॉ.अनिल कुराडे, स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख प्रा. एन.बी.ईकीले यांच्या उपस्थितीत या यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार करून त्याच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.