राज्य विक्रीकर निरीक्षक चैतन्य कुराडे व भाऊसाहेब आंबुलकर यांचे मत
गडहिंग्लज(प्रतिनिधी): शिक्षण मंचच्या वतीने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांमुळेच स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होऊन स्पर्धा परीक्षेचा पाया भक्कम होण्यास मदत झाली. त्यामुळे शिक्षणमंच म्हणजे स्पर्धा परीक्षेचा पाया भक्कम करणारे व्यासपीठ आहे असे मत राज्य विक्रीकर निरीक्षक पदी निवड झालेले चैतन्य विष्णू कुराडे व भाऊसाहेब रावसाहेब आंबुलकर यांनी व्यक्त केले.
पी.सी.पाटील गुरुजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, पी.सी. पाटील गुरुजी गौरवनिधी व मधुकर येसणे गौरवनिधी संचलित शिक्षणमंच गडहिंग्लजच्या वतीने प्रज्ञाशोध परीक्षा प्रश्नसंच पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा राज्य विक्रीकर निरीक्षकपदी निवड झालेले चैतन्य कुराडे व भाऊसाहेब आंबुलकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मनोगतात त्यांनी आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकर साळुंखे होते.
शिक्षक नेते मधुकर येसणे यांनी जिल्हा परिषद व नगरपालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्यासाठी शिक्षणमंचवतीने घेण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद व आदर्श असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी शंकर साळुंखे, अर्चना निळकंठ, पांडुरंग करंबळकर यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी प्रश्नसंच निर्मिती केलेल्या शिक्षकांचा सत्कार शिक्षणमंचच्या वतीने मार्गदर्शक भरत शेळके, सहसचिव वैशाली कोष्टी, केंद्र प्रतिनिधी गीता सानप तसेच पांडुरंग कापसे, विठ्ठल कदम, संभाजी पाटील, सूर्यकांत चौगुले, माजी सभापती संजीव गोणी व संजय सासुलकर यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाला शिक्षक नेते सुभाष निकम, डी.एस.खामकर, शिक्षक बँक संचालक नंदकुमार वाईंगडे, शिक्षक बँक माजी अध्यक्ष अण्णासाहेब शिरगावे, पी.सी. पाटील पतसंस्थेचे सभापती बाळासाहेब वालीकर, उपसभापती अनिल बागडी, अनिसचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश भोईटे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष भीमराव तराळ, शिक्षक भारतीचे अध्यक्ष बसवराज अंकली, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे श्रीनाथ पाटील यांच्यासह विष्णु कुराडे, रावसाहेब अंबुलकर, राजकुमार शिंगटे, दिलीपकुमार पाटील उपस्थित होते.
स्वागत कार्याध्यक्ष शरद देसाई , प्रास्ताविक अध्यक्ष सचिन पाटील तर सूत्रसंचालन श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष मालन पाटील यांनी केले. आभार सचिव विक्रम गडकर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आप्पा शिवणे, आयाज बागवान, दिनकर खवरे, विनायक पवार, शिवाजी कोंडुस्कर, सुनील कांबळे, मलिक करीमगोळ, दिलीप शिंगटे, शरद पवार, राजाराम साळवे, वैशाली भोईटे, अनिल पाटील, मनीषा पाटील, विजय शिंदे, श्रीकांत कल्लोळे,गणेश कांबळे,रत्नाकर लाड, अमित जाधव व महेश कुंभार यांनी परिश्रम घेतले.





