Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संत गजानन अभियांत्रिकीत "महिला लैंगिक छळ व प्रतिबंधक कायदा" विषयावर कार्यशाळा


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
महागाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात "महिला लैंगिक छळ व प्रतिबंधक कायदा 2013" या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून गडहिंग्लजचे पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संत गजानन महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. स्वागत प्राचार्य डॉ.एस.एच. सावंत यांनी केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे यांनी महिलांविषयी असणाऱ्या कायद्यांची माहिती देऊन या कायद्यांची जनजागृती कशी करावी याबाबत सविस्तरपणे सांगितले.

या कार्यशाळेस प्रा.एन.बी. पठाण, प्रा.एस.एस.सूर्यवंशी, प्रा. ए.ए.देशपांडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. समन्वयक म्हणून प्रा.ए.पी. नारायणकर यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन प्रा.एस.बी.पोवार यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.