गडहिग्लज(प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय पुरुष वेटलिफ्टिंग व महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये शहाजी कॉलेज कोल्हापूर , देवचंद कॉलेज अर्जुननगरने वर्चस्व सिद्ध करून जास्तीत-जास्त बक्षिसे पटकाविली आहेत. ४५ ते ८७ वजनी महिला गटात व ५५ ते १०९ व त्यावरील गटात या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेतील विजेत्यांना शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲड.दिग्विजय कुराडे व अन्य मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे उदघाटन शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख डॉ.राहुल मगदूम यांनी केले. यावेळी ५६ महाराष्ट्र बटालियनचे सुभेदार श्री.अडसुळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे, सचिव डॉ.अनिल कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. शिवाजी विद्यापीठ निवड समितीचे अध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील, प्रा.रवी चव्हाण, प्रा.विक्रम यमगेकर, स्पर्धा निरीक्षक प्रा.बकस कुरणे आदि उपस्थित होते. या स्पर्धेत अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी-सहभाग घेतला. यामधून अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघ निवडण्यात आला. स्पर्धा संयोजनासाठी डॉ.धनंजय पाटील, प्रा.एस.जी.धुरे, डॉ.एस.बी.माने, उपप्राचार्य प्रा.तानाजी चौगुले, प्रा.बी.एस.पठाण व प्रशासकीय सेवक यांनी विशेष सहकार्य केले.
या स्पर्धेतील वजनगट निहाय निकाल असा :
पुरुष गट- ५५ किलोगट- वल्लभ जुगळे- परशुराम सनदी डी.के. ए. एस.सी. इचलकरंजी, प्रतीक चौगुले, न्यू कॉलेज कोल्हापूर, ६१ किलो गट - अक्षय फडतरे एन.डी. पाटील कॉलेज सांगली, सौरभ पाटील- ए. डी. कॉलेज सांगली, ६७ किलो गट- हर्षद पाटील- शहाजी कॉलेज कोल्हापूर, अभिजित माने टी.के.आय.टी.कॉलेज वारणानगर.
७३ किलो गट- अखिलेश मोते देवचंद कॉलेज अर्जुननगर, तुषार घोरपडे-अण्णासाहेब डांगे कॉलेज हातकणंगले, कार्तिक कांडले- टी.के.आय.टी कॉलेज वारणानगर, ८१ किलो गट-प्रीतम चव्हाण-एस.के.कुरुंदवाड, अब्दुसमद सय्यद - देवचंद अर्जुननगर, ८९ किलो गट-निहाल बत्ती- वेणूताई चव्हाण कराड, ऋषिकेश काशिद -शहाजी कॉलेज कोल्हापूर, आदित्य शिंदे-के.डब्लू.सी, सांगली, ९६ किलो गट- रितेश म्हैशाळे, आदित्य शिंदे आदर्श कॉलेज विटा, प्रणीत सातवेकर टी.के.आय.टी.कॉलेज वारणानगर, १०२ किलो गट -अंकित खुरपे-देवचंद कॉलेज अर्जुननगर, धैर्यशील इंगळे, संदेश वाघ- देवचंद कॉलेज अर्जुननगर, १०९ किलो -आदित्य कोलेकर, १०९ वरील गट- चिन्मय जाधव नाईट कॉलेज, कोल्हापूर, श्रेयस बाम - विवेकानंद कोल्हापूर, अनंत शिंदे-टी.के.आय.टी.कॉलेज वारणानगर.
महिला गट-४५ किलो गट-अपेक्षा ढोले-नाईट कॉलेज इचलकरंजी, ४९ किलो गट- प्रतीक्षा साठे -नाईट कॉलेज इचलकरंजी, सरिता सावंत- शहाजी कॉलेज कोल्हापूर, धनश्री कळसगोंडा- डॉ.घाळी कॉलेज, गडहिंग्लज, ५५ किलो-पूर्वा जानवेकर शाहू कॉलेज कोल्हापूर, आरती पाटील, श्वेता कापसे - देवचंद अर्जुननगर ५९ किलो- सोनाली गायकवाड- एस.के.कुरुंदवाड, अश्विनी हद्दीमनी- कन्या महाविद्यालय, जयसिंगपूर, ६४ किलो- प्राजक्ता साळुंखे-एल.बी.एस.सातारा, प्रणाली फाटक, कनक सूर्यवंशी- कन्या महाविद्यालय, कडेगाव, ७१ किलो- स्नेहा अमाने-जयवंत कॉलेज, इचलकरंजी, कार्तिकी कचरे -कन्या महाविद्यालय, कडेगाव, तेजस्विनी तोरस्कर -देवचंद अर्जुननगर, ७६ किलो-श्रेय घनमुखी- नाईट कॉलेज, इचलकरंजी, ८१ किलो-स्नेहल वरटे-देवचंद अर्जुननगर, स्नेहल भोंगाळे- नाईट कॉलेज, इचलकरंजी, तन्वी जगताप- कन्या महाविद्यालय, कडेगाव आदी विजेत्यांना गौरविण्यात आले.




