भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषदेच्या वतीने कारवाईचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
सातारा (प्रतिनिधी): सातारा येथील पत्रकार प्रशांत जगताप यांना पत्रकार परिषद सुरू असतानाच एका व्यक्तीने केलेली मारहाण ही निंदनीय बाब असून या घटनेचा भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषदेच्या वतीने कराड येथे जाहीर निषेध करण्यात आला. संबंधित व्यक्तीवरती पत्रकार हल्ला विरोधी कायदे अंतर्गत कठोरात कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना संघटनेच्या वतीने ईमेलद्वारे देण्यात आले.
संघटनेचे अध्यक्ष विश्वास मोहिते 👇यांनी नोंदविला निषेध
यावेळी संघटनेचे अध्यक्ष विश्वास मोहिते, सांगली जिल्हा अध्यक्ष संपत जाधव, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस संपतराव मोहिते, सांगली जिल्हा उपाध्यक्ष अक्षय गायकवाड, शिराळा तालुका अध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांच्यासह कोल्हापूर,सांगली सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.
