संस्थेचे पहिले अध्यक्ष खासदार कै. बाळासाहेब माने यांना अभिवादन
महाविद्यालयात नव्याने उभारण्यात येणाऱ्या वातानुकूलित भव्य सभागृहाच्या कामाचा शुभारंभ
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात संस्थेचे पहिले अध्यक्ष खासदार कै. बाळासाहेब माने यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयात कै. रामचंद्र मांडेकर पाणपोईचे उदघाटन तरुण उद्योजक रोहित मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
खासदार कै. बाळासाहेब माने यांच्या प्रतिमेचे पूजन शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. या पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयात कै. रामचंद्र मांडेकर पाणपोईचे उदघाटन तरुण उद्योजक रोहित मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महाविद्यालयात नव्याने उभारण्यात येणाऱ्या वातानुकूलित भव्य सभागृहाच्या कामाचा शुभारंभ संस्थेचे उपाध्यक्ष जे.वाय.बारदेस्कर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे उपाध्यक्ष जे.वाय. बारदेस्कर, सचिव डॉ.अनिल कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी आपल्या मार्गदर्शनातून खासदार कै. माने यांनी शिवराज विद्या संकुलाला दिलेले मोलाचे योगदान सांगून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रशासकीय सेवक सुरेश मोरबाळे यांनी आपल्या मनोगतातून खासदार कै. माने यांच्या कार्याचा साक्षीदार आपण असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास संस्थेचे बसवराज आजरी, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. सुधीर मुंज, नॅक समन्वयक प्रा. किशोर अदाटे, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार आझाद पटेल यांनी मानले.




