Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णी येथे एकाची गळफास लावून आत्महत्या

गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी (तालुका गडहिंग्लज) येथे गजानन शिवलिंगप्पा जांगनुरे (वय 48, राहणार तेली गल्ली) यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. याची वर्दी पत्नी श्रीमती स्मिता गजानन जांगनुरे यांनी हलकर्णी पोलीस दूरक्षेत्र येथे दिली आहे. याची नोंद पोलिसात झाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की, मयत गजानन हे गेल्या काही दिवसापासून चिडचिड करीत होते. त्यांना काही विचारले तरी ते रागावून बोलत होते. दरम्यान आज सकाळी पावणे सात ते दहा वाजण्याच्या सुमारास दूंडाप्पा चौगुले यांच्या मालकीचे भाड्याने घेतलेल्या गोडाऊनमध्ये लाकडी तुळईला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास लावून गजानन यांनी आत्महत्या केल्याची वर्दी पत्नीने दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.