Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लिंगायत समाजाच्या संघटनात्मक कामास बसवराज आजरी यांच्याकडून प्रारंभ


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्य लिंगायत संघर्ष समितीचे गडहिंग्लज तालुकाध्यक्ष बसवराज आजरी यांनी येथील महात्मा बसवेश्वर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व लिंगायत समाजाच्या संघटनात्मक कामास प्रारंभ केला.

स्वागत वीरशैव समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष राजशेखर दड्डी यांनी केले. प्रास्ताविक महात्मा बसवेश्वर पुतळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश कोळकी यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रीय बसव दलाचे गडहिंग्लजचे प्रमुख महेश आरभावी, महालक्ष्मी यात्रा कमिटीचे अध्यक्ष रमेश रिंगणे, श्रीमती शारदा आजरी यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली.

यावेळी वीरशैव समाजसेवा मंडळाच्या वतीने अध्यक्ष राजशेखर दड्डी, बसवेश्वर पुतळा प्रतिष्ठान समितीच्या वतीने डॉ. एम. एस. बेळगुद्री, बसव दलाच्या वतीने महेश आरभावी, महादेव मुसळे यांनी श्री.आजरी यांचा सत्कार केला.

आपल्या मनोगतात बसवराज आजरी म्हणाले, महाराष्ट्र राज्य लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील रुकारी(पुणे), समन्वयक  ओमप्रकाश कोयटे, कार्याध्यक्ष श्रीमती सरलाताई पाटील यांनी माझी केलेली निवड सार्थ ठरवत सामाजिक वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी व त्यांच्या न्याय हक्कांसाठी मी नेहमी कार्य करीत राहीन. लिंगायत समाजातील सर्व पोटजातीच्या प्रतिनिधींना एकत्र घेऊन समाजाच्या उन्नतीसाठी नेहमीच प्रयत्नशील राहीन. याकरिता सर्व समाज बांधवांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी समाजातील प्रमुख नागाप्पांना कोल्हापुरे, काशिनाथ घुगरे, नरेंद्र भद्रापूर, दयानंद खन्ना, दयानंद पाटील, पाटील समाजाचे अध्यक्ष बी.बी.पाटील, जंगम समाजाचे महेश तुरबतमठ, बाळासाहेब गुरव, बसवेश्वर पुतळा समितीचे बाळासाहेब घुगरे, प्रवीण मेणसे, पापू रमनकट्टी, राहुल शिरकोळे, महादेव मुसळे, सुधीर पाटील, निखिल पट्टणशेट्टी, जवाहर घुगरे, बसवराज जमदाडे, अमोल हातरोटे, तुकाराम कोरी, तम्मा बोरगावे, वीरूपाक्ष पाटणे, राजू कोवाडे, गुंड्या पाटील, सचिन पाटील, श्रीकांत येरटे, अनिकेत बेल्लद, श्रीकांत स्वामी, वीराप्पा कोरी, सौ.अश्विनी मगदूम, अरविंद पाटील, आप्पासाहेब बस्ताडे, अजित सुतार यांच्यासह समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. आभार जितेंद्र पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.