गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी येथील सिद्धिविनायक क्लिनिकच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त उद्या रविवार दिनांक १८ डिसेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती डॉ.कपील पाटील व डॉ. धनश्री पाटील यांनी दिली आहे.
या शिबिरात जनरल हेल्थ चेकअप, मधुमेह, रक्तदाब, थायरॉईड, अस्थमा, वंधत्व, सर्व प्रकारचे हाडांचे आजार, सर्व प्रकारचे त्वचारोग यावर तपासणी केली जाणार आहे. या सर्व आजारांवर होमिओपॅथिक व ॲलोपॅथिक उपचार सिद्धिविनायक क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत. सदर शिबिर हे तेरणी बस स्टॅन्ड वरील जमादार कॉम्प्लेक्समध्ये आयोजित केले आहे. या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.कपील पाटील व डॉ.धनश्री पाटील यांनी केले आहे.

