गडहिंग्लज (प्रतिनिधी): कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्था संचलित शिवराज इंग्लिश स्कूलमध्ये ख्रिसमस डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
सकाळी झालेल्या कार्यक्रमाला शिवराज संकुलाचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे उपस्थित होते. सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनींनी लाल- पांढरा वेष परिधान केला होता. इयत्ता तिसरी व चौथीच्या मुलींनी ख्रिसमस गाण्यावर आपली कला सादर केली. शिक्षिका सौ. वेरिनोका बारदेस्कर, सौ. निर्मला बारदेस्कर, सौ.रिटा मेनेंझिस यांनी ख्रिसमस गीत व प्रार्थना सादर केली. सौ. वेरिनोका बारदेस्कर यांनी सांताक्लॉजच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले.
सदर कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका सौ. गौरी शिंदे यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन सौ. रिटा मेनेंझिस यांनी केले. सौ. दीपा आंबोलकर यांनी आभार मानले.

