गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालय, एच.डी.एफ.सी.बँक, केदारी रेडेकर हॉस्पिटल व अर्पण ब्लड बँक कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ४२ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले.
या शिबिराचे उदघाटन संस्थेचे संचालक श्रीरंग उर्फ पापा चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक जनसंपर्क अधिकारी प्रा. विक्रम शिंदे यांनी केले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ.अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, एच.डी.एफ.सी. बँकेचे अधिकारी विजय महाडिक, अमृत सावंत, आनंद सूर्यवंशी, संदीप पाटील, शिवराज पाटील यांच्यासह अन्य मान्यवर, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होते.
महाविद्यालयाच्या एन.सी.सी.विभागाच्या वतीने विभाग प्रमुख डॉ.राहुल मगदूम व प्रा.जयवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी.सी.च्या कॅडेटनी हे रक्तदान शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

