Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चंदगड उर्दू हायस्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिवस विविध उपक्रमांनी साजरा


चंदगड
: चंदगड उर्दू हायस्कूल येथे राष्ट्रीय गणित दिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अमजदअली काझी हे होते. गणित विभागप्रमुख नवाज शरीफ बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

दिनांक 22 ते 24 डिसेंबर असे तीन दिवस विविध उपक्रम घेण्यात आले. जवळजवळ 120 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. पहिल्या दिवशी वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा व गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावर आधारित चित्रपट दाखविण्यात आले. दुसऱ्या दिवशी गणितीय चित्रकला स्पर्धा व गणितीय रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. शेवटच्या दिवशी "गणित जत्रा" भरविण्यात आली. यात विविध विद्यार्थ्यांनी बनविलेल्या नाविन्यपूर्ण गणितीय उपकरणांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या गणितीय जत्रेला विविध मान्यवर संस्थेचे पदाधिकारी, संचालक, पालक व ग्रामस्थांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट वर्ग सजावट करुन, स्वतः हाताने  विविध निमंत्रण पत्रिका व बॅचेस बनविले होते. गणितीय जत्रा या दालनाचे उदघाटन मुख्याध्यापक अमजदअली काझी, मुबारक लाटकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

स्वागत इमरान नाईकवाडी, प्रस्ताविक नवाजशरीफ बागवान, सूत्रसंचालन हाजरा ताकिलदार यांनी केले. आभार शकील मकानदार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  वासीम शेरखान व माजीद तगारे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.