Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजच्या संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेजचे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत यश


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
वारणानगर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत येथील संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी धवल यश मिळविले. या सर्व खेळाडूंची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

खेळाडू सानिका उत्तम गुंजकर ४०० मीटर धावणे प्रथम, २०० मीटर धावणे व्दितीय, लांब उडी तृतीय, साक्षी अमृत चौगुले उंच उडी, थाळीफेक व्दितीय, शेखर दिलीप उबारे, संकेत गंगाधर आर्दाळकर, धैर्यशील जोतीराम गोडसे, आशिष मारुती पाटील, रोहन बाबू चौगुले ४×१०० रिलेमध्ये प्रथम, ४×४०० रिलेमध्ये व्दितीय. या सर्व विद्यार्थ्यांनी धवल यश प्राप्त केले.

यशस्वी खेळाडूंचे महाविद्यालयाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ.अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांचे प्रोत्साहन तर पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले व क्रीडा शिक्षक जयवंत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.