Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्याचा विकास करावा: प्रा.सौ.बिनादेवी कुराडे


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
आजच्या या विज्ञान युगात जीवन कौशल्ये विकसित करणे हे अंत्यत महत्वाचे आहे. त्या दृष्टीने वाटचाल करणार्‍या विद्यार्थ्याचा भविष्यकाळ उज्वल राहणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तीमत्व विकासासाठी संवाद कौशल्ये विकसित करणे आवश्यक आहे. सद्याच्या स्पर्धेच्या युगात आपण सर्वच दृष्टीने सक्षम होणे आवश्यक आहे. आपल्यातील क्षमता ओळखून आपल्या करिअरसाठी आपल्यातील संवाद कौशल्ये विकसित करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांनी केले.

शिवराज कॉलेज ऑफ फार्मसी व रुबीकॉन रिसर्च सेंटर मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चार दिवशीय कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

या कार्यशाळेत रुबीकॉन रिसर्चचे प्रशिक्षक भक्ती फाटे यांनी सद्याच्या स्पर्धेच्या विद्यार्थ्यांनी अपडेट राहणे गरजेचे आहे. आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतरांवर पडला पाहिजे यासाठी व्यक्तिमत्वाच्या कार्यशाळा उपयुक्त ठरत आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन केले. प्राचार्य डॉ.राहुल जाधव यांनी शैक्षणिक ज्ञानाबरोबरच विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली सर्वांगीण प्रगती करणे आवश्यक आहे. यासाठी अशाप्रकारचे उपक्रम उपलब्ध होतात. त्याचा वेळीच उपयोग करून घेणे गरचे आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहणे महत्वाचे आहे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या चार दिवशीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास, मुलाखत कौशल्ये, गटचर्चा, नेतृत्व विकास आणि शिष्टाचार या विषयावर सविस्तरपणे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी प्रा.रोहिणी पाटील, प्रा.गणेश कांबळे, प्रा. राऊत यांच्यासह सर्व कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पूजा पाटील यांनी केले तर आभार प्रा.अनिल वडर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.