Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज फार्मसीमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये औषधनिर्माणशास्त्र विभागाच्या प्रथम वर्षाच्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा.अनघा पाटील यांनी केले.या कार्यक्रमात सचिव डॉ.अनिल कुराडे यांनी औषधनिर्माणशास्त्र हे इतर शाखांपेक्षा वेगळे असे क्षेत्र आहे. त्याला आजच्या घडीला फार महत्व आले आहे. या क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी आहे. ही संधी आरोग्याला न्याय देणारी आहे. त्यामुळे हे क्षेत्र सेवेशी निगडी आहे. त्यामुळे समाधान देणारे कार्य आपल्या हातून घडावे म्हणून या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे करिअर करावे असे आवाहन डॉ.अनिल कुराडे यांनी स्पष्ट केले.

प्रा.एम.के.नोरेंज यांनी औषधनिर्माणशास्त्र म्हणजे काय व या क्षेत्रातील संधी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ.राहुल जाधव यांनी महाविद्यालयाचा आढावा घेऊन बी.फार्मसीच्या अभ्यासक्रमाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्रा.प्रणव सावेकर, प्रा.आरती केरुरे यांच्यासह सर्व स्टाफ, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार प्रा. ऋतुजा सावेकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.