श्री.महाकाली परिवर्तन पॅनलचे उमेदवार महादेव तेलवेकर यांची माहिती
सभासदांचा आम्हाला भरघोस पाठिंबा, महाकाली परिवर्तन पॅनलचा विजय निश्चित
गडहिंग्लज तालुका सहकारी पतपेढी मर्या मुंबई पंचवार्षिक निवडणूक
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुका सहकारी पतपेढीमधील सर्वसामान्य सभासदांच्या मेहनतीचे पैसे वाचविण्यासाठी पंचवार्षिक निवडणुकीच्या माध्यमातून श्री. महाकाली परिवर्तन पॅनल रिंगणात असून सत्ताधाऱ्यांची मक्तेदारी मोडून काढून सभासद हिताचा कारभार करण्यासाठी आमची धडपड सुरू आहे. अशी माहिती सेवानिवृत्त बँक अधिकारी व श्री.महाकाली परिवर्तन सहकार पॅनलचे उमेदवार महादेव तेलवेकर यांनी दिली.
गडहिंग्लज तालुका सहकारी पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री. तेलवेकर बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, सभासदांच्या हक्काची संस्था टिकली पाहिजे यासाठी श्री. महाकाली परिवर्तन सहकार पॅनलच्या माध्यमातून आमचे प्रयत्न सुरू आहेत. संस्थेत चाललेला मनमानी कारभार मोडून काढण्यासाठी महाकाली पॅनलच्या माध्यमातून आम्ही सभासदांसमोर जात आहोत. सभासदांचाही आम्हाला वाढता पाठिंबा आहे.
श्री.तेलवेकर पुढे म्हणाले, संस्थेतील सभासदांच्या अहिताच्या कारभाराला चाप बसविण्यासाठी श्री.महाकाली पॅनलचे प्रतिनिधी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. सभासदांच्या कर्ज वाटपात कमिशन मिळवण्याचा सुरू असलेला प्रकार आम्ही बंद करू, त्याचबरोबर बोगस वहान कर्ज वाटप, कार्यालय दुरुस्ती तसेच नवीन शाखा उघडण्याच्या नावाखाली सुरू असलेली उधळपट्टी बंद करू. सभासदांचे हित बाजूला ठेवून सत्ताधारी पॅनलची सुरू असलेली मक्तेदारी मोडून काढू आणि संस्था वाचवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या पंचवार्षिक निवडणुकीच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध लढा लढू मग जिंकू किंवा हरू याची पर्वा नाही. आमचा अन्यायाविरुद्धचा हा लढा पाहून सभासदांचा आम्हाला वाढता पाठिंबा असून श्री. महाकाली परिवर्तन पॅनलचा विजय हा निश्चित आहे यात तीळ मात्र शंका नाही. 'मान छत्रीलाच आहे आणि शिक्काही छत्रीलाच आहे'. असा ठाम विश्वास उमेदवार महादेव तेलवेकर यांनी व्यक्त केला.


