गडहिंग्लज (प्रतिनिधी): राज्याच्या हितासाठी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) व वंचित बहुजन आघाडी यांची युती झाल्याच्या निर्णयाचे गडहिंग्लज येथे शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करत फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नायगाव येथे संयुक्त पत्रकार परिषद घेत शिवशक्ती - भीमशक्ती युतीची घोषणा केली आहे.
गडहिंग्लज येथे या निर्णयाचे शिवसेना(ठाकरे गट)व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप माने व वंचित बहुजन आघाडीचे श्री.थरकार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख संतोष चिकोडे, वसंत नाईक, दिगंबर पाटील, सुरेश हेब्बाळे, बाबासाहेब कुंभार, केदार डांग, काशिनाथ गडकरी, सुशील विभुते, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष सुळकुडे, तालुकाध्यक्ष अर्जुन दुंडगेकर, सुरेश थरकार, शिवराज कांबळे, सागर कटनायक, विजय शिरगावकर, सुनील कांबळे, महादेव खातेदार यांच्या इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


