कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवशीय कार्यशाळा संपन्न
गडहिंग्लज(प्रतिनिधी): प्रथम एज्युकेशन फौंडेशनचे कार्य आदर्शवत आहे. या फौंडेशन मार्फत फोर व्हीलर, टू व्हीलर मेकॅनिक, जनरल ड्युटी असिस्टंट, असिस्टंट इलेक्ट्रिशियन, कोर्सबरोबरच संवाद कौशल्ये, व्यक्तिमत्व विकास, मुलाखतीची तयारी, बेसिक कॉम्प्यूटर नॉलेज, व्यवसाय मार्गदर्शन या उपयुक्त कोर्सच्या सुविधा उपलब्ध करून संस्थेने विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी विशेष नियोजन केले आहे. या बहुमोल संधीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे यांनी केले.
येथील संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रथम एज्युकेशन फौंडेशन कोल्हापूर यांच्यावतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एक दिवशीय मार्गदर्शन कार्यशाळेत ते उदघाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनी केले. यावेळी प्रथम एज्युकेशन फौंडेशनच्या आसमा पठाण, शितल कांबळे, गौरीमठ यांनी विद्यार्थ्यांना संस्थेच्यावतीने विविध कोर्सबाबत सविस्तर माहिती दिली. प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा.संतोष पाटील, प्रा.गीता देसाई यांच्यासह, ज्युनिअरचे शिक्षक, विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी प्रा. विक्रम शिंदे, प्रा. स्वप्नील आर्दाळकर, जितेंद्र देसाई यांनी कार्यक्रमाचे यशस्वीपणे नियोजन केले. प्रा. तानाजी भांदुगरे यांनी सर्वांचे आभार मानले.



