पंचमहाभूत लोकोत्सवस्थळी सदिच्छा भेट
परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्याशी केली चर्चा
कणेरी मठ (कोल्हापूर): कणेरी मठावर आयोजित सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवास वारणा उद्योग समूहातर्फे सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे अभिवचन वारणा उद्योग समूहाचे प्रमुख आणि 'जनसुराज्य'चे माजी मंत्री आमदार विनय कोरे (सावकार) यांनी दिले.
आज परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांची पंचमहाभूत लोकोत्सवाच्या उभारणीस्थळी सायंकाळी उशिरा सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. कोल्हापूरसह महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या लोकोत्सवात वारणा उद्योग समूहाचे सर्वतोपरी सहकारी राहील असे अभिवचन दिले. यावेळी त्यांच्या समावेत झालेल्या चर्चेत शंकर पाटील, डॉ . संदीप पाटील, माणिक पाटील चुयेकर , यशोदर्शन बारामतीकर आदींशी त्यांनी संवाद साधला.


