गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी येथे श्री. महालक्ष्मी देवीची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. तेरणी येथील श्री. महालक्ष्मी देवीची यात्रा तब्बल नऊ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दिनांक २ मे ते ६ मे दरम्यान होत आहे. या पार्श्वभूमीवर गावात यात्रेची जोरदार तयारी सुरू आहे. गावात उत्साहाचे वातावरण आहे.
संकेश्वर येथील प्रसिद्ध वामन भटजी यांनी देवीची पूजा करून मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम पार पाडला. यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ ग्रामस्थांनी घेतला. गावातील भक्तांनी मोठ्या संख्येने सुजी, गुळ, तांदूळ, भाजीपाला, अन्य साहित्य देणगी दिले. यावेळी महालक्ष्मी देवस्थानचे हक्कदार देसाई, इनामदार, पाटील, कुलकर्णी, नाईक, उथळे, ढब, मलकानावर, निंबाळकर, इंगवले सावेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

