कोल्हापूर : कणेरी मठ येथील गो शाळेतील 50 हून अधिक गायी दगावल्याचे वृत्त हाती आले आहे. ३० गाईंवर उपचार सुरू आहेत. ह्या गायी नेमके कशामुळे दगावल्या हे अजून स्पष्ट झाले असून शिळे अन्न खाल्याने दगावल्याची चर्चा सुरू आहे.
सध्या कणेरी मठावर गेली चार दिवस झाले पंचमहाभूत लोकोत्सव सोहळा सुरू आहे. त्यातच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. गंभीर असलेल्या गाईंवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार सुरू आहेत.

