Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी- हलकर्णी मार्गावर अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : तेरणी- हलकर्णी मार्गावरील भागीरथी घसरतीनजीक झालेल्या अपघातात महागाव येथील दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली आहे. सदर दुचाकीस्वार यमकनमर्डी येथून महागावकडे तेरणी मार्गे हलकर्णीकडे जात असताना ही घटना घडली. नेमका अपघात कसा घडला याची नेमकी माहिती अजून हाती आली नसून जखमी दुचाकीस्वारास हलकर्णी येथील रुग्णवाहिकेतून वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्ना शिखरे यांनी तातडीने गडहिंग्लज येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.