![]() |
| (सर्व छायाचित्रे : मज्जीद किल्लेदार) |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): "काळभैरी, बाळभैरी भैरीच्या नावानं चांगभलं" च्या गजरात गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री काळभैरव देवाची यात्रा मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
![]() |
| (सर्व छायाचित्रे : मज्जीद किल्लेदार) |
सोमवारी सायंकाळी हजारो भक्तांच्या गर्दीत गडहिंग्लज शहरात पालखी सोहळा उत्साहात पार पडला. त्यानंतर पालखी मिरवणुकीने रात्री डोंगरावर दाखल झाली. रात्री बारा वाजता शासकीय पूजा करण्यात आली.
पहाटे काकड आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. यात्रेनिमित्त श्री काळभैरव देवाची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सर्व भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी प्रशासनातर्फे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे प्रत्येक भाविकाला श्री काळभैरव देवाचे मनसोक्त दर्शन झाले.
भाविकांच्या सेवेसाठी वैद्यकीय पथक देखील तैनात करण्यात आले होते. गडहिंग्लज आगाराने यात्रेसाठी खास बसेस दिवसभर सुरू ठेवल्याने भाविकांची चांगली सोय झाली. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, पोलीस उपअधीक्षक राजीव नवले, पोलीस निरीक्षक रोहित दिवसे, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी स्वरूप खारगे, यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा सुरळीतपणे पार पडली.
![]() |
| (सर्व छायाचित्रे : मज्जीद किल्लेदार) |












