तुर्की, सीरियामधील भूकंपावरून मानव जातीला निसर्गाचा इशारा
कणेरी मठ (कोल्हापूर): पंचमहाभूतांचे संतुलन ठेवणे हीच काळाची गरज असल्याचे तुर्की व सीरियामधील भूकंपावरून स्पष्ट झाले असून समस्त मानव जातीला हा निसर्गाचा इशारा असल्याचे मत परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी व्यक्त केले.
सीरिया आणि तुर्की देशात तब्बल सात रिश्टर स्केल झालेला भूकंप हा आजवरचा सर्वात भयानक असा प्रंचड मोठ्या धक्क्याचा भूकंप ठरलेला आहे. त्यामुळे आपण सर्वजणच चिंतेत असणे स्वाभाविकच आहे. या भूकंपामध्ये मृत पावलेल्या सर्व मनुष्य आणि प्राणीमात्रांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया आणि कोणत्याही परिस्थितीत भूगर्भाच्या आत अथवा भूगर्भावर अतिरेकी प्रमाणात हस्तक्षेप होऊ नये यासाठी सर्वांनीच दक्षतेने सजग राहणे हीच काळाची गरज आहे. हाच या महाभयानक भूकंपाने पुन्हा एकदा अवघ्या जगातील मानव जातीला दिलेला हा इशारा आहे असे हितगुजपर मनोगत स्वामीजी यांनी व्यक्त केले.
बातमीचा व्हिडिओ पहा 👇🏼
तसेच निसर्ग आणि पर्यावरण समतोल राखणे, विनयशीलपणे निसर्गाशी समरस होऊन पंचमहाभूतांचे संतुलन राखणे हे काळाची गरज असून त्यासाठी व्यापक प्रमाणात प्रबोधन होण्यासाठीच अगदी प्राथमिक शाळा पासून ते संशोधक विद्यार्थ्यांपर्यंत आणि समाजातील विविध घटकावरील विविध प्रकल्प राबवणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनासह विविध संस्था आणि समाज घटकांनी वेळीच पुढाकार घ्यावा असेही मत स्वामीजी यांनी व्यक्त केले आहे.

