गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील नवज्योत तरुण मंडळाच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सुधीर उर्फ आप्पा शिवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष मांगले, दिनेश किल्लेदार, प्रेम इंगळे, पवन बुगडे, आकाश देसाई व मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

