गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव( ता.गडहिंग्लज ) येथील संत गजानन महाराज फार्मसी पदविकेच्या मुलींच्या संघाने कराड (सातारा )येथील शासकीय कॉलेजमध्ये झालेल्या एस.के.एस. डिप्लोमा फार्मसी असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावले. तसेच मयुरी गोईलकर या विद्यार्थिनीला सामनावीर व मालिकावीर हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला.
या स्पर्धेत एकूण 22 संघ सहभागी झाले होते. संघाचा विजय होताच कॉलेजमधील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी जल्लोष साजरा केला. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष ॲड.आण्णासाहेब चव्हाण यांनी अभिनंदन तर प्राचार्य डॉ. अन्सार पटेल व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.

