![]() |
| गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. (छायाचित्र: मज्जिद किल्लेदार) |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात सुकन्या युथ फेस्टिवल यांच्यावतीने आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या विशेष कर्तृत्ववान महिलांचा विशेष सत्कार संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्रा.सौ.बिनादेवी कुराडे होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड.नीता चव्हाण उपस्थित होत्या. संस्थेचे सचिव डॉ.अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
![]() |
| गडहिंग्लज : रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उदघाटन करताना शिक्षिका सौ. सुवर्णा बाळेश नाईक. यावेळी उपस्थित प्रा. सौ. बिनादेवी कुराडे यांच्यासह इतर. |
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा. आशा पाटील यांनी केले. यावेळी बँक ऑफ इंडिया शाखा उत्तूरच्या सहाय्यक प्रबंधक वैशाली सुधीर मुंज, एस. जी. एम. कॉलेजच्या डॉ. मंगला मोरबाळे, हॉटेल व्यवस्थापिका प्राची सुरज कोले, शिक्षिका सुवर्णा बाळेश नाईक, मुख्याध्यापिका रशिदा शेख, आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेत सुवर्णपदक, विजेते खेळाडू सृष्टी रेडेकर व त्यांचे आई-वडील आदींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
![]() |
| गडहिंग्लज : शिक्षिका सौ. सुवर्णा बाळेश नाईक यांचा सत्कार करताना प्रा.सौ. बिनादेवी कुराडे. |
प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेते-वैशाली कदम (कोल्हापूर), सरिता इनामदार (गारगोटी), निशिगंधा देशपांडे, सुनिता देसाई , मुग्धा खोत तसेच रेवती बिडवे, सोहम सुतार, विद्यार्थी तृप्ती गायकवाड, सानिका गडवळे, पल्लवी पाटील, आदित्य पाटील, अंकिता फगरे आदींना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. नीता चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये आपली संस्कृती आपण सर्वांनी जपली पाहिजे. समाजात स्त्री जन्माचे स्वागत होणे आवश्यक आहे. आज स्त्रीया सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत, हे वास्तव सत्य आहे. त्यांना समाजात सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. असे स्पष्ट करून त्यांनी स्त्रियांच्या संरक्षणासाठी कोणकोणते कायदे आहेत याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांनीही मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतातून प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांनी महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेणे गरजेचे आहे. असे स्पष्ट केले.
डॉ.मंगला मोरबाळे, प्राची कोले, रशिदा शेख, सरिता इनामदार यांच्यासह अन्य मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आपण कसे घडलो, आपणाला मिळालेली प्रेरणा आणि आपल्या आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. गगनबावडा कॉलेजच्या प्राचार्या सौ.विद्या पाटील यांनी आपण आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे, आपल्या जिद्द आणि कष्टाच्या जोरावर आपल्या कर्तृत्वाला उजाळा देण्याचा प्रयत्न केला तरच जीवनात यशस्वी व्हाल असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास रेखा पोतदार, डॉ, परिणीता पाटील, मुख्याध्यापिका सौ.गौरी शिंदे, प्रा.सौ,पौर्णिमा कुराडे, डॉ.श्रद्धा पाटील, प्रा. सौ. दीपिका खांडेकर-पंडित, प्रा. मनीषा निलवे, प्रा. रेवती राजाराम, प्रा.तेजस्विनी शिंदे, सौ.सविता निकम यांच्यासह अन्य मान्यवर, सर्व महिला प्राध्यापिका, प्रशासकीय पहिला कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होतें. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बियामा वाटंगी, प्रा. नाजिया बोजगर, प्रा.श्रुती पाटील यांनी केले तर आभार प्रा, सौ.एम.आर.दंडगे यांनी मानले.



