Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राजा शिवछत्रपती महाविद्यालयात 'कवी आपल्या भेटीला' कार्यक्रम संपन्न


गडहिंग्लज(प्रतिनिधी):
येथील राजा शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये मराठी विभागाच्या वतीने "कवी आपल्या भेटीला" कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी 'आई' कवितासंग्रहाचे लेखक यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा. डॉ.चंद्रकांत पोतदार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

डॉ.पोतदार यांनी कविता कशी सुचते, एखाद्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आत्मभान, समय सूचकता महत्वाची असते असे सांगितले. यावेळी शिवराज महाविद्यालयातील मराठीचे प्रा. डॉ. ए.बी.कुंभार यांनी संत साहित्यावरील कवितेतून संवाद साधला. नेसरी महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. माधव भोसले यांनी प्रेमाविषयीच्या कविता सादर केल्या.

स्वागत व प्रस्ताविक प्रा.डॉ. सुकुमार आवळे यांनी केले. आभार प्रा.एन.आर.पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. निवास जाधव यांचे मार्गदर्शन तर संस्थाध्यक्ष बाळासाहेब कुपेकर यांची प्रेरणा लाभली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.