Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागावात छ. शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर जयंती व रमजान ईद उत्साहात

दिवसभर गावात धार्मिक वातावरण


हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना दिल्या शुभेच्छा



महागाव : छ.शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त प्रतिमा पूजन प्रसंगी महारुद्र तौकरी, सरपंच प्रशांत शिंदे, उपसरपंच संदीप कोकितकर यांच्यासह अन्य.



    

गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथे छ.शिवाजी महाराज व विरशैव समाजाचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांची जयंती  आणि मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दिवसभर महागावात धार्मिक वातावरण पाहायला मिळाले. हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

      


विरशैव समाजाचे संस्थापक महात्मा बसेश्वर यांची जयंती  विरशैव समाजाच्या वतीने महादेव मंदिर येथे साजरी करण्यात आली. महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन तमन्ना उत्तुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य हृदयनाथ सोमशेट्टी यांनी महात्मा बसवेश्वरांच्या जीवन कार्याची माहिती सांगितली. बीएससी ॲग्रीचे  शिक्षण चांगल्या गुणांनी पूर्ण केल्याबद्दल नम्रता खानापुरे व मलखांब स्पर्धेत यश संपादन केलेल्या विनायक चौगुले याचा सत्कार करण्यात आला. यावेळी वैरशैव समाजाचे बांधव उपस्थित होते.

      


ग्रामपंचायत महागाव येथे बसवेश्वर जयंती निमित्त छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच प्रशांत शिंदे यांच्या हस्ते, महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन जनता बँकेचे माजी शाखाधिकारी महारुद्र तौकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच संदीप कोकितकर, ग्रामपंचायत सदस्य विकास इंगवले, दिपक जमदाडे, राजू जंगम, राजू वाली, अर्जुन रेडेकर, प्रवीण तौकरी, सुभाष खानापुरे, वीरपाक्ष खानापुरे, सुनिल चौगुले, संतोष आजगेकर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, लिंगायत समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महागाव : अप्पी पाटील युवा मंचचे अध्यक्ष श्रीशैल पाटील यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.


उंबरवाडी येथील मैदानावर मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. नमाज पठणानंतर देशात सामाजिक सलोखा, शांतता, बंधुता, सुख समृद्धी यासाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.