Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगावात जागतिक ग्रंथदिन साजरा



गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव येथील कै. बापूसो आप्पासो कित्तूरकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जागतिक ग्रंथदिन साजरा करण्यात आला.


सुरुवातीला ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन गडहिंग्लज कृषी उत्पन्न  बाजार समितीचे नूतन संचालक रवींद्र शेंडुरे यांच्या हस्ते तसेच ग्रंथ पूजन अनिकेत कोणकेरी यांच्या हस्ते करण्यात आले.




यावेळी वाचनालयाचे  अध्यक्ष बाळासाहेब मोर्ती, प्रा.काशिनाथ सावेकर, सिद्धाप्पा बंदी, प्रकाश गोरुले, राजशेखर कित्तूरकर, आझाद अत्तार, गणपती चोथे, वसंत नाईक, ग्रामपंचायत सदस्य बसवराज बंदी, मारुती साळवेकर, शामराव कोरी, वीरूपाक्ष हुदली, मारुती कुरबेट्टी, आप्पासो कापसे, अण्णासो साळवेकर यांच्यासह वाचक व ग्रामस्थ उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.