Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शेंद्रीतील महाबौद्ध विहारासाठी साहित्य देणाऱ्या दानदात्यांचे गडहिंग्लजला जंगी स्वागत

गडहिंग्लज : पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांच्या हस्ते धम्मध्वज फडकावून सर्व वाहने मिरवणुकीने शेंद्रीकडे रवाना करण्यात आले.
                             (छायाचित्र: मज्जिद किल्लेदार) 


गडहिंग्लज (प्रतिनिधी): शेंद्री येथे उभारले जात असलेल्या महाबौद्ध विहारासाठी साहित्य देणाऱ्या दानदात्यांचे गडहिंग्लज येथील दसरा चौकात जंगी स्वागत करण्यात आले.




महाबौद्ध विहारासाठी खडी, वाळू, सिमेंट व स्टील हे साहित्य दान स्वरूपात संजय लब्यागोळ, अरुण सिद्धनाईक, दयानंद सिद्धनायक, अर्जुन दूंडगेकर, शिवराज कांबळे, शिवाजीराव माने, शितल कांबळे, संजय कांबळे आदींनी भारतीय बौद्ध महासभा गडहिंग्लजकडे सुपूर्द केले. साहित्य भरलेल्या सर्व वाहनांचे पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांच्या प्रमुख उपस्थितीत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक श्री. सरगर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. श्री. सरगर यांचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. धम्मध्वज फडकावून सर्व वाहने सवाद्य मिरवणुकीने शेंद्रीकडे रवाना करण्यात आले.




यावेळी आंबेडकर चळवळी मधील सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत एस.आर. कांबळे यांनी केले. भीमशक्ती सामाजिक संघटनेचे परशुराम कांबळे, भीमराव मोहिते, संजय कांबळे, आनंदराव कांबळे, प्रा. जी. पी.कांबळे, एस.बी. बालेशगोळ, दयानंद कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे अर्जुन दूंडगेकर, एस.पी.थरकार, शिवराज कांबळे, विजय शिरगावकर, एस.आर.कांबळे, प्रा. डी.जी.चिघळीकर, सौ.प्रिती कांबळे, सौ.रूपाली कांबळे, आर.पी.आयचे मधुकर कांबळे, भारतीय बौद्ध महासभा गडहिंग्लज शाखेचे ए.के.कांबळे, एम. ए. कांबळे, महेश देशमुख, रवी भोसले, भिमराव तराळ, राधाताई लब्यागोळ, समता सैनिक दलाचे कॅप्टन तुकाराम कांबळे, ईश्वर कांबळे, भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा शेंद्रीचे सर्व शाखा पदाधिकारी, परशुराम कांबळे, अमर कांबळे, संतराम कांबळे, सुरेश कांबळे, शिवानंद कांबळे यांच्यासह बौद्ध उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत प्रभारी सरपंच प्रतिभा कांबळे यांनी केले. आभार भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष ए.के.कांबळे यांनी मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.