Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला शिवसेनेकडून छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर जयंती साजरी



गडहिंग्लज (प्रतिनिधी): महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व विरशैव समाजाचे संस्थापक महात्मा बसवेश्‍वर जयंती गडहिंग्लज तालुका शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) दसरा चौक मध्यवर्ती कार्यालयात साजरी करण्यात आली.


यावेळी तालुका प्रमुख दिलीपराव माने यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 


तालुका प्रमुख दिलीप माने म्हणाले, अद्वितीय व्यक्तिमत्व असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीचा अभ्यास व त्यांच्या कार्याचे कौतुक सातासमुद्रापलिकडे जगभरात आजही केले जाते. जात, पात, धर्म, पंथ या पलिकडे जाऊन अठरा पगड जाती धर्माच्या मावळ्याना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छ. शिवाजी महाराज हे सर्वांचे आहेत.


यावेळी सह संपर्कप्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे , संभाजी पाटील, आजरा तालुकाप्रमुख युवराज पोवार, गडहिंग्लज उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी, विभाग प्रमुख दिगंबर पाटील, आशपाक मकानदार, फिरोज मणेर, अस्लम सानेदिवाण, परवेज शेख, सोहेल मकानदार, संजीत पाटील (कडगाव), आकाश रणनवरे,  ॲड. राजेंद्र सबनीस, नितीन पोटे, दत्तात्रय पाटील, बाजीराव साळोखे, तुकाराम पेडणेकर, राजू डोंगरे, जानबा पाटील, बाळू कडूकर, सदाशिव कोरवी, दिपकराव पाटील, बाळासाहेब हिरेमठ, आप्पासाहेब पाटील, अवधूत पाटील, प्रशांत जाधव, ओंकार अर्कशाळी, प्रवीण सासुलकर, संकल्प लोखंडे, पियुष सोरटे, रोहन माने यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.