गडहिंग्लज (प्रतिनिधी): उर्दू विद्या मंदिर तेरणी येथे ग्रामपंचायतमार्फत पंधराव्या वित्त आयोगातून चार एलईडी टीव्ही संच देण्यात आले.
सदर टीव्ही संच वितरण सरपंच करवीर उथळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माजी सरपंच मोसीम मुल्ला, सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मलिक जकाती, दिलावर साबखान, कुतुबुद्दीन गंधनवाले, रियाज जमादार, जमीर मुल्ला, मलिक नायकवाडी यांच्यासह सर्व महिला सदस्य, शिक्षक, पालक उपस्थित होते.
मुख्याध्यापिका अरिफा मोमीन यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी शाळेची माहिती सांगितली. चांदसाहेब बाडवाले यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन जुबेदा तहसीलदार यांनी केले.



