Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कल्याण- पाटगाव बससेवा सुरू; बुकिंग करण्याचे आवाहन



कल्याण : कल्याण आगारातून सकाळी ५:४५ व सायंकाळी ७ वाजता कल्याण- पाटगाव ही बस सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती आगाराने दिली आहे. या बस सेवेसाठी बुकिंगही सुरू झाल्याची माहिती देण्यात आली असून प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.    



कल्याण, सातारा, कराड, कोल्हापूर, पेठनाका, वठार, गारगोटी, पाटगाव या मार्गे ही बस धावणार आहे. उद्यापासून या बस सेवेसाठी बुकिंग चालू करण्यात येणार असल्याचे सांगितले. सुट्टीच्या कालावधीत ही बससेवा सुरू केल्याने प्रवाशांची सोय झाली आहे.




ही बससेवा सुरु करण्यासाठी कल्याण पुर्वचे आमदार गणपत गायकवाड, कल्याण- डोंबिवलीचे उपमहापौर मोरेश्वर भोईर, शिवसह्याद्री प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष सतीश पेडणेकर, अंबाबाई प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष गिरधर कुराडे व शिवसह्याद्री प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष संतोष पाटील यांनी पाठपुरावा केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.