![]() |
| हलकर्णी: छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करताना गंगाधर व्हसकोटी, जयकुमार मुन्नोळी, फिरोज ताशिलदार व अन्य मान्यवर. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी येथील राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गंगाधर व्हसकोटी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे विचार व कार्याला उजाळा देण्यासाठी कृतज्ञता पर्व सोहळ्यानिमित्त शंभर सेकंद स्तब्ध राहून मानवंदना देण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य जयकुमार मुन्नोळी, फिरोज ताशिलदार, तेगीनहाळ सरपंच शेखर बाडकर, मनोज जाधव, शिवकुमार संसुद्दी, प्रसाद जोशी, चंद्रकांत गुरवानगोळ, अल्ताफ मुल्ला, फिरोज ताशिलदार, अशोक पाटील, अमानुल्ला मालदार उपस्थित होते.


