गडहिंग्लज (प्रतिनिधी): संत गजानन शिक्षण समुहामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( एन.टी. ए.) मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश चाचणी परीक्षा ( नीट ) सुरळीत पार पडली. राज्यातील सर्वाधिक १२४८ परीक्षार्थी असलेल्या केंद्रावर बैठक व्यवस्था करण्यात आली होती. त्यापैकी १२३० विद्यार्थी उपस्थित राहून परीक्षा दिली.
या केंद्रावर ५२ ब्लॉक होते. प्रत्येक ब्लॉकमध्ये २४ परीक्षार्थींची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी १०४ पेक्षा अधिक पर्यवेक्षक , ४ उपकेंद्र संचालक व १ केंद्र संचालक सदरची परीक्षा यशस्वी करण्यासाठी कार्यरत होते. तसेच १० कर्मचारी बायोमेट्रिक तर २० कर्मचारी परीक्षार्थींचे रजिस्ट्रेशन व इतर कामकाजासाठी दीडशेहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती केंद्र संचालक प्राचार्य डॉ.एस. एच. सावंत यांनी दिली.
ही परीक्षा दुपारी दोन ते सायंकाळी ५.२० यावेळी घेण्यात आली. या केंद्रावरील मुख्य गेटवर सकाळी आकारा पासूनच नाव नोंदणी व तपासणी करूनच विद्यार्थ्यांना आज प्रवेश देण्यात येत होता. प्रत्यक्षात परीक्षा दोन वाजता असली तरी विद्यार्थी व पालकांनी सकाळी नऊ पासूनच केंद्रावर हजेरी लावली होती. परीक्षा काळात कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
राज्यभरातून या परीक्षेसाठी येणाऱ्या परीक्षार्थींच्या व पालकांच्या वाहनांसाठी गर्दी होऊ नये म्हणून स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.
गतवर्षी या परीक्षा केंद्रावर ९१४ विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली होती. त्यावेळी यशस्वीपणे नियोजन केल्यामुळे यंदा या परीक्षा केंद्रावर राज्यातील सर्वाधिक १२४८ परीक्षार्थीची नोंदणी झाली होती, प्रत्यक्षात १२३० परीक्षार्थीनी परीक्षा दिली.



