गडहिंग्लज (प्रतिनिधी): शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला वेळेत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणेे गरजेचे आहे. त्याचबरोबर गावचा विकास करून आदर्श गाव निर्माण करावे असे प्रतिपादन ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. गंगाधर व्हसकोटी यांनी केले.
हलकर्णी येथे राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयात तेगीनहाळचे नूतन सरपंच शेखर बाडकर यांच्या सत्कारानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ गंगाधर व्हसकोटी व जयकुमार मुन्नोळी यांच्या हस्ते सरपंच शेखर बाडकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जयकुमार मुन्नोळी यांनी मार्गदर्शन केले. उपसरपंच मनोज जाधव, ओबीसी सेलचे जिल्हा खजिनदार फिरोज ताशिलदार, शिवकुमार संसुद्धी, प्रसाद जोशी, चंद्रकांत गुरवानगोळ, अल्ताफ मुल्ला, मारुती पाटील, अशोक पाटील, बाबुराव पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


