Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी येथील पश्चिम भागात सुरळीत व मुबलक पाणी पुरवठा करा

तेरणी ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीला निवेदन 


तेरणी : सरपंच करवीर उथळे यांना निवेदन देताना पश्चिम भागातील ग्रामस्थ. यावेळी उपस्थित उपसरपंच सौ. दीपा नरेवाडी, सदस्या अक्काताई हजेरी यांच्यासह राजू इंगवले, बाळासाहेब निंबाळकर, दिनकर जाधव आदी.


गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी येथील पश्चिम भागात ग्रामस्थांना अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला निवेदन देत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. सदर निवेदन सरपंच करवीर उथळे यांना देण्यात आले. यावेळी उपसरपंच सौ. दीपा नरेवाडी, सदस्य रमेश पुजेरी, सदस्या सौ. अंजना निंबाळकर, अक्काताई हजेरी, सोनव्वा कतिगार, ग्रामसेवक निवृत्ती कोंडुस्कर उपस्थित होते. सदर निवेदन दिनकर जाधव, करवीर जाधव यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.



तेरणी गावातील पश्चिम भागात राहणाऱ्या ग्रामस्थांना अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच पाणीपुरवठाही कमी दाबाने होत असल्याने मुबलक पाणी मिळत नाही. परिणामी पाण्यासाठी विंधन विहिरीवर पायपीट करावी लागते. ग्रामपंचायतीने या निवेदनाची दखल घेऊन तातडीने सुरळीत पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. 



निवेदनावर विठ्ठल जाधव, करवीर मगदूम, अनिल यरनाळे, अमोल इंगवले, संतोष इंगवले, दिनकर जाधव, जोतिबा सावेकर, करण नाईक, यल्लाप्पा नाईक, बाळेश इंगवले, लागमान्ना नाईक, शोभा नाईक, लक्ष्मी नाईक, सखुबाई जाधव, सिद्धवा भोगाणे, मालू जाधव, मंगल इंगवले, पारवा मांगले, महादेवी नाईक, व्हळेव्वा नाईक, बाबू मगदूम यांच्यासह इतर ग्रामस्थांच्या सह्या आहेत. यावेळी बाळासाहेब निंबाळकर, सुरेश कतिगार, किरण चौगुले उपस्थित होते. 



सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्नशील : सरपंच करवीर उथळे


पश्चिम भागातील ग्रामस्थांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात येतील. या भागात नियमित व पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा केला जाईल असे आश्वासन सरपंच करवीर उथळे यांनी ग्रामस्थांना दिले. त्याचबरोबर जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामस्थांना कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सोय करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे देखील सरपंच श्री. उथळे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.