Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुलांना मातृभाषेत शिक्षण द्या : एन. आर .फडके

महागावच्या महात्मा फुले विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा




गडहिंग्लज (प्रतिनिधी): मातृभाषेतूनच विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊ शकतात. मराठी ही आपली मातृभाषा आहे. या माध्यमातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी उच्चपदस्थ आहेत. असे मत मलिग्रे हायस्कूल, मलिग्रेचे माजी मुख्याध्यापक एन.आर. फडके यांनी  व्यक्त केले.


समर्थ महाराष्ट्र शिक्षण मंडळ महागाव संचलित महात्मा फुले विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या १९९१-९२ या बॅचच्या  माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आय. एस. पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्था प्रतिनिधी आण्णासाहेब पाटील उपस्थित होते. 

      

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व वर्गमित्र शहीद अशोक बिरंजे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. त्यावेळी अध्यापन करणाऱ्या आजी व माजी शिक्षकांना निमंत्रित करण्यात आले होते. सदानंद जगंम, डी.एन.पाटील, के.एन पाटील, ए .ए . देसाई, महादेव कोले, आर. एच. पाटील, एल .ए. जांबुटकर, बाबुराव कोले, दत्ता राणे, नारायण कांबळे, भिमराव चिगरे, अनिल हलकर्णीकर आदी शिक्षक उपस्थित होते.  दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानतंर माजी विद्यार्थी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.



या कार्यक्रमाला प्रा. शिवाजीराव होडगे, भिमराव भुईबर, रविंद्र पाटील, नारायण होडगे, शांताराम वाघराळकर, महेश पाटील, किरण पाटील, रमेश कळविकट्टे, एकता पाटील यांच्यासह   शिक्षक-शिक्षेकेत्तर कर्मचारी व आजी माजी विद्यार्थी उपस्थितीत होते. स्वागत व प्रास्ताविक मल्लिकार्जुन मुगळी  तर आभार गंगाधर जमदाडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.