Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागावच्या सरस्वती स्कूलमध्ये पहिलीच्या वर्गाचे उदघाटन


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथे समर्थ महाराष्ट्र शिक्षण मंडळ, महागाव संचलित श्री. सरस्वती प्रायमरी स्कूलमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गाचे उदघाटन संस्थेचे संस्थापक चेअरमन शंकरराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य आय. एस. पाटील होते.



कार्यक्रमास संस्था प्रतिनिधी आण्णासाहेब पाटील, शोभादेवी पाटील, उपसरपंच संदीप कोकितकर उपस्थित होते. यावेळी सत्यनारायण पूजेची आयोजन केले होते. सदर कार्यक्रमास ग्रा.पं.सदस्य उदय सोमशेट्टी, सुरज असवले, फिरोज सोलापुरे, ऐश्वर्या पाटील यांच्यासह पालक, प्रशालेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. आभार सुभाष सुतार यांनी मानले.







Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.