
हलकर्णी : येथील बी. एम.टोणपी विद्यालयात आमदार राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व फळे वाटप करताना डॉ.गंगाधर व्हसकोटी, जयकुमार मुन्नोळी व अन्य मान्यवर.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हलकर्णी येथील बी.एम.टोणपी विद्यालयात ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ गंगाधर व्हसकोटी, जि.प.माजी सदस्य जयकुमार मुन्नोळी, जिल्हा बँक संचालक संतोष पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व फळांचे वाटप करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक आनंद पाटील यांनी केले. यावेळी शिवकुमार संसुद्धी, प्रसाद जोशी, आप्पासाहेब टोणपी, परशुराम कीर्तीकर, वसंतराव बोगाळे, बी. एस. माळी, रिजवान पटवेगार, राणोजी ठोंबरे, अतुल कांबळे, अभिजीत देसाई, दिग्विजय कोळी, आनंदा मठपती यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. अतुल पाटील यांनी आभार मानले.

