Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बुलडाणा अर्बन क्रेडिट सोसायटीच्या वतीने मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

                                                     (छायाचित्र: मज्जिद किल्लेदार)

गडहिंग्लज (प्रतिनिधी): बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या गडहिंग्लज शाखेच्या वतीने मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.




बुलडाणा अर्बन को-ऑप. केडिट सोसायटी ही देशातील सर्वात मोठी पतसंस्था आहे. या संस्थेच्या एकूण ४७५ शाखा असून ठेवी  ११५०० कोटींच्या आहेत. कर्जे ८५०० कोटी अशी संपत्तीक  स्थिती आहे. संस्थेने आर्थिक व्यवहाराबरोबरच सामाजिक उपकम व शैक्षणिक उपकमाची कास कधीच सोडली नाही. संस्थेने गडहिंग्लज शहर व आजूबाजूच्या खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांकरिता नवे शैक्षणक दालन उघडले आहे. एम.पी.एस.सी व यु.पी.एस.सी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका सुरू केली आहे.



१९ जून हा संस्थेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधुन गडहिंग्लज शाखेमध्ये मुंबई पोलिस दलात निवड झालेले विद्यार्थी अमर परीट, परशुराम राजगोळे, श्रीधर सावंत, कृष्णा घुगरे, जयवंत शिंदे, विकास जाधव यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सर्व विद्यार्थ्यांनी बुलडाणा अर्बनने सुरू केलेल्या अभ्यासिकेचा लाभ घेतला आहे.



या कार्यकमास विभागीय व्यवस्थापक गुरूनाथ लोखंडे, शाखा व्यवस्थापक नामदेव पाटील व सर्व स्टाफ तसेच सदानंद वाली, अमर मांगले, महेश सलवादे, पांडुरंग पोवार, प्रदिप सावळे, सुभाष निकम, आण्णासो शिरगावे, अशोक मोहिते, गजानन पाटील, चनबसाप्पा बंदी, मारूती हुंचाळे यांच्यासह ग्राहक उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.