Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'संत गजानन' हॉस्पिटलमध्ये हृदयविकारासंबंधीच्या सर्व तपासण्या व उपचार आता मोफत

दररोज दुपारी दोन ते चार या वेळेत होणार तपासणी


चोवीस तास तज्ञ डॉक्टर असणार उपलब्ध 







गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील संत गजानन महाराज मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमधील हृदयरोग विभागात हृदयविकार संबंधीच्या सर्व तपासण्या आता दररोज दुपारी दोन ते चार यावेळी तज्ञ डॉक्टरांच्या वतीने मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत. यामुळे या परिसरातील सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक व वेळेची बचत होणार आहे. याचा संबंधित रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.यशवंत चव्हाण यांनी  केले आहे.



वेळीच लक्षणे ओळखा, हार्ट अटॅक टाळा : डॉ.शेखर भिसे व डॉ. प्रियांका पाटील




"मध्यमवयीन आणि त्यानंतरच्या वयातील व्यक्तीला हार्टअटॅक येणार असेल तर त्याच्या सूचना महिना आधीपासूनच मिळतात पण ही लक्षणे वेळीच ओळखून निदान व उपचार केल्यास  नक्कीच या आजारापासून स्वतःला लांब ठेवू शकतो. रक्तदाब, मधुमेह, स्थूलपणा, तंबाखूजन्य व दारूच्या अतिआहारी जाणे, फास्ट फूड, पाश्चात्य पद्धतीचा अवलंब यामुळे हृदयरोगाच्या प्रमाणात वाढ होत आहे. चालताना धाप लागणे, श्वास भरून येणे, छातीत कळा मारणे, दरदरून घाम येणे, छातीत धडधडणे किंवा श्वास कोंडल्यासारखे वाटणे हे सर्व  अटॅक येण्याची प्राथमिक लक्षणे आहेत. अशाप्रकारची लक्षणे आढळल्यास तत्काळ हृदयरोग रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरकडून  उपचार केल्यास येणारे हार्ट अटॅक आपण टाळून स्वतःचे जिव वाचवू शकतो असे प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ.शेखर भिसे व डॉ. प्रियांका पाटील यांनी यावेळी सांगितले .

           


रुग्णसेवेसाठी 24 तास डॉक्टरांची टीम उपलब्ध : डॉ. यशवंत चव्हाण




'आजच्या धावपळीच्या काळात मधुमेह ही वेगाने वाढणारी आरोग्य समस्या आहे. अधिक फॅट असलेले पदार्थाचे नियमित सेवन व व्यायामाचा अभाव, बैठे कामामुळे ही समस्या अधिकच वाढलेली आहे. कायमस्वरुपी मधुमेही रुग्णातील नसामध्ये एक चिकट पदार्थ जमा होत जातो. थरावर थर जमल्यामुळे तेथील नसा बंद होतात, परिणामी नसामधून रक्तप्रवाह सुरळीत होत नसल्याने हार्टअटॅक व स्ट्रोकचा धोका वाढून रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असतो. अशा रुग्णांमध्ये अटॅक कधी आला हे कळतही नाही. काही रुग्णात लक्षणेही आढळत नाहीत. त्यामुळे "मी अगदी ठणठणीत बरा आहे.... मला काहीच झाले नाही...." या भ्रमात काही रुग्ण राहून स्वतःचे नुकसान करून घेतात. आज भारतात पंचवीस टक्याहून अधिक हृदयविकाराचे रुग्ण आढळतात. त्यात दररोज झपाट्याने वाढ होत आहे. वेळीच लक्षणे ओळखून तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व सल्ल्यांची तितकीच गरज आहे.  ही गंभीर समस्या लक्षात घेऊन रुग्णाची होणारी फरफट आर्थिक नुकसान लक्षात घेत आम्ही दररोज दुपारी दोन ते चार या वेळेत मोफत हृदयरोग तपासणी व सर्व चाचण्या मोफत करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी पन्नास बेडचे स्वतंत्र व  अतिदक्षता विभाग व सुसज्य कॕथलॕब असून यात चोवीस तास डॉक्टरांची टीम उपलब्ध आहे. आतापर्यत या सेंटरमधून चारशे हून अधिक ॲजिंओग्राफी व दिडशेहून अधिक ॲजिंओप्लास्टी द्वारे रुग्ण उपचार घेत ठणठणीत बरे झालेले आहेत. तसेच मधुमेह रुग्णाच्या पायातील जखमेमुळे रक्तवाहिन्या बंद होतात त्या जखमा लवकर कमी होत नाहीत. परिणामी रुग्णाला चालणेही मुश्कील बनते. यासाठी टीबिल ॲजिंओप्लास्टीची सुविधा येथे उपलब्ध आहे. तसेच या रुग्णालयातील महात्मा फुले व कर्नाटकचे सुवर्ण आरोग्य शासकीय मोफत योजनेचा लाभ जिल्ह्यासह कर्नाटक सिमाभागातील रुग्णांनी घ्यावा असे आवाहन विश्वस्त डॉ. यशवंत चव्हाण यांनी केले आहे. यावेळी डॉ.सुरेखा चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ. संजय चव्हाण यांच्यासह इतर डॉक्टर उपस्थित होते.



बायपासला केला बाय..बाय.....


यावेळी डॉ.चव्हाण यांनी अवघड परिस्थितीतही अनेक वयोवृध्द रुग्णाच्या उपचार यशस्वी केल्याचे सांगत तालुक्यातील एका ७८ वय असलेल्या महिला रुग्णाला ट्रिपल व्हेसल ब्लॉक झाला होता. त्या रुग्णाला मुंबई येथील दोघा डॉक्टरांनी बायपास करण्याचा सल्ला दिला होता. ही शस्त्रक्रिया करणे अत्यंत जोखीमीची होती. अशा वेळी नातेवाईकानी येथील डॉक्टरांचा सल्ला घेत बायपास करणे टाळून ॲजिंओग्राफी व ॲजिंओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. ते रुग्ण आज ठणठणीत बरे असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.